SBI रिसर्चमार्फत (SBI Research) नुकताच भारताच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षातील सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (Gross Domestic Product - GDP) वाढीचा अंदाज ७.३% पर्यंत वाढविण्यात आला आहे.

ठळक मुद्दे:

  • २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी (FY27) स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक संशोधन विभागाने (Economic Research Department - ERD) आपल्या ताज्या अहवालात भारताच्या GDP वाढीचा अंदाज ६.६% वरून ७.३% पर्यंत वाढवला आहे.
  • मागील आर्थिक वर्षातील याच तिमाहीत ६.९% वाढीच्या दराची नोंद करण्यात आली होती.
  • त्याच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या (FY27) पहिल्या तिमाहीत अर्थात एप्रिल ते जून कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या ७.८% वाढीच्या दराचा सुधारित अंदाज वर्तवण्यात आला आहे.

SBI Research बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • मुख्य वैशिष्ट्य: हा SBI चा संशोधन आणि आर्थिक विश्लेषण विभाग (Research and economic analysis wing) म्हणून प्रसिद्ध आहे.
  • महत्वपूर्ण कार्य: 'इकोरॅप (Ecowrap)' या आपल्या प्रमुख अहवालांद्वारे आणि धोरणात्मक संशोधन प्रकाशनांद्वारे हा विभाग भारताचे व्यापक आर्थिक कल तसेच वित्तीय बाजारपेठांबाबत विश्लेषण आणि अंदाज प्रदान करण्याचे कार्य करतो.