संपूर्ण भारतात विमा सेवा उपलब्ध करून देण्यासाठी SBI Life ची नुकतीच J&K बँकेसोबत भागीदारी करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- SBI Life Insurance Company Limited ने Jammu & Kashmir Bank Limited (J&K Bank) सोबत 'कॉर्पोरेट एजन्सी' भागीदारी केली आहे.
- सदर भागीदारीद्वारे, J&K Bank च्या देशभरातील शाखांच्या जाळ्याचा वापर करून SBI Life ची विमा उत्पादने वितरित केली जातील आणि संबंधित सेवा पुरवल्या जातील.
- आर्थिक समावेशकता बळकट करणे आणि भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (IRDAI) '२०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा' या ध्येयाला पाठिंबा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
SBI Life Insurance बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- स्थापना वर्ष: २००१ मध्ये SBI Life Insurance ची स्थापना करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र) येथे कंपनीच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.