नुकतेच स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत (State Bank of India - SBI) मुंबई येथे ‘CyRIS’ या सायबर सुरक्षा उत्कृष्टता केंद्राचे (Cybersecurity Centre of Excellence) उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • भारतातील वित्तीय क्षेत्रात सायबर सुरक्षा क्षमता बळकट करणे, धोक्यांविषयीची माहिती अधिक प्रभावी करणे तसेच सायबर लवचिकता सुधारणे हा याचा मुख्य उद्देश आहे.
  • सदर केंद्राचे उद्घाटन श्री. संजय लोहिया (सचिव, वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालय) यांच्या हस्ते SBI चे अध्यक्ष सल्ला श्री. श्रीनिवासुलू (सी. एस.) शेट्टी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
  • ‘CyRIS’ सायबर सुरक्षा धोरण हे प्रशिक्षण, संशोधन, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि धोक्यांविषयीची माहिती यांना THINK (विचार), INNOVATE (नाविन्य) आणि DEFEND (संरक्षण) या ३ आधारस्तंभांच्या अंतर्गत एकत्रित करते.
  • सदर केंद्र हे डिजिटल फॉरेन्सिक्स, एथिकल हॅकिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षा तसेच धोक्यांविषयीची माहिती यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल.