नुकताच आसाममध्ये ईशान्य भारतातील पहिले 'जलतरणासाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र [National Centre of Excellence (NCoE)]' स्थापन करण्यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India - SAI), बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया (Badminton Association of India - BAI) आणि आसाम क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of Assam - SAA) यांच्यात त्रिपक्षीय करार संपन्न झाला आहे.
ठळक मुद्दे:
- आसाममध्ये 'जलतरणासाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र [National Centre of Excellence - NCoE] स्थापन करण्यासाठी तसेच ईशान्य भारतातील उच्च-क्षमता क्रीडा परिसंस्था बळकट करण्यासाठी एका त्रिपक्षीय करारावर SAI, BAI आणि SAA यांनी स्वाक्षरी केली आहे.
- सदर करारानुसार, SAI ला राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी आसाममध्ये ऑलिम्पिक-आकाराचा स्विमिंग पूल उपलब्ध करून दिला जाईल.
- ईशान्य क्षेत्रातील हे पहिलेच जलतरणासाठीचे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र असेल.
SAI-आसाम जलतरण राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र उपक्रमाबाबत थोडक्यात महत्वाचे:
- या कार्यक्रमाचे आयोजक आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासोबत आसामच्या क्रीडा मंत्री आणि खासदार बिजुली कलिता मेधी, तसेच SAI चे अधिकारी मंजुश्री दयानंद आणि डी. के. मित्तल उपस्थित होते.
- आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांमधील जलतरणपटूंची निवड या केंद्रमार्फत करण्यात येणार असून त्यांना विशेष प्रशिक्षण व व्यावसायिक मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आवश्यक असलेली उच्च-स्तरीय मदत जलतरणपटूंना पुरवण्यास हे केंद्र सहाय्यभूत असेल.
- ईशान्य भारतात क्रीडा पायाभूत सुविधा बळकट करणे आणि उच्च-क्षमतेची क्रीडा परिसंस्था निर्माण करणे ज्यामुळे खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी मिळेल हा या उत्कृष्टता केंद्राचा मुख्य उद्देश आहे.
SAI बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): SAI म्हणजेच Sports Authority of India अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरण होय.
- स्थापना वर्ष: १९८४ मध्ये SAI ची स्थापना करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे SAI चे मुख्यालय स्थित आहे.
- SAI संबंधित मंत्रालय: SAI ही युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या (Ministry of Youth Affairs and Sports - MYAS) अंतर्गत कार्यरत आहे.
- प्रमुख कार्य: भारतामध्ये खेळांना प्रोत्साहन देणे तसेच त्यांचा विकास करणे हे SAI चे प्रमुख कार्य आहे.