नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'S&P ग्लोबल रेटिंग्ज'मार्फतच्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष २०२७ आणि २०२८ मध्ये भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (Gross Domestic Product - GDP) विकासदर ७% इतका राहणार आहे.
ठळक मुद्दे:
- त्यांच्या 'आशिया-पॅसिफिक आर्थिक दृष्टिकोन - पहिली तिमाही (Economic Outlook Asia-Pacific First Quarter (Q1)), २०२७' या अहवालात, आर्थिक वर्ष २०२६-२७ (FY27) साठी भारताचा GDP विकासदर ७% इतका कायम ठेवण्यात आला आहे.
- आर्थिक वर्ष २०२७-२८ (FY28) साठीचा अंदाज २० बेसिस पॉइंट्सनी (bps) कमी करून तो ७% वर आणला आहे.
- यासोबतच आर्थिक वर्ष २०२८-२९ (FY29) साठीचा अंदाज २० बेसिस पॉइंट्सनी वाढवून तो ७.२% इतका करण्यात आला आहे.
- या सर्व बाबींबरोबरच २०२७ मध्ये आशिया-पॅसिफिक प्रदेशातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचे स्थान अबाधित राहिले आहे.