नुकताच रॉजर फेडररचा 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेममध्ये (International Tennis Hall of Fame)' समावेश करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे:

  • अमेरिकेतील न्यूपोर्ट, ऱ्होड आयलंड येथील 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेममध्ये (International Tennis Hall of Fame)' स्विस टेनिस दिग्गज व्यक्तिमत्व रॉजर फेडररचा समावेश करण्यात आला आहे.
  • टेनिस क्रीडा विभागामधील हा एक अत्यंत प्रतिष्ठित स्वरूपाचा सन्मान मानला जातो.
  • प्रसिद्ध टेनिस पत्रकार आणि प्रसारक मेरी कॅरिलोचाही फेडररसोबतच योगदानकर्ता (Contributor) श्रेणीमध्ये सन्मान करण्यात आला आहे.

रॉजर फेडररबद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • टेनिसमधील महान खेळाडूंमध्ये रॉजर फेडररची गणना करण्यात येते.
  • आपली कारकीर्द गाजवतान फेडरर यांनी २० ग्रँड स्लॅम विजेतेपदे तसेच जवळपास १०३ ATP टूर विजेतेपदे जिंकली आहेत. 
  • अव्वल स्थान अर्थात 'जागतिक क्रमांक १' चे स्थान जवळपास ३१० आठवडे इतक्या प्रदीर्घ काळासाठी भूषवण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.
  • या त्यांच्या विलक्षण कारकिर्दीत ८ विम्बल्डन विजेतेपदे आणि 'करिअर ग्रँड स्लॅम' पूर्ण करण्याच्या उल्लेखनीय कामगिरीचा समावेश आहे.
  • फ्रेंच ओपन जिंकून त्यांनी साल २००९ मध्ये 'करिअर ग्रँड स्लॅम (Career Grand Slam)' पूर्ण केले.
  • २०१७ मध्ये दुखापतीनंतर अचंबित करणारे पुनरागमन करत त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन या दोन्ही मोठ्या स्पर्धा जिंकल्या.
  • २०२२ मधल्या 'लेव्हर कप'नंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारली.
  • त्यानंतर पात्रतेच्या पहिल्याच वर्षी त्यांचा 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश करण्यात आला आहे.