भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत नुकताच 'आर्थिक स्थिरता अहवाल (Financial Stability Report)' २०२६ प्रसिद्ध करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे:

  • 'आर्थिक स्थिरता आणि विकास परिषदे'च्या उप-समितीद्वारे हा सहामाही अहवाल तयार करण्यात येतो.
  • भारतीय वित्तीय प्रणालीच्या स्थिरतेसमोरील सध्याच्या व उद्भवणाऱ्या धोक्यांचे एकत्रित मूल्यांकन यामध्ये मांडले जाते.

मुख्य निष्कर्ष:

  • आर्थिक वाढ (Growth): २०२५-२६ या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेने खाजगी उपभोग आणि स्थिर गुंतवणुकीच्या बळावर ७.७% इतकी जबरदस्त वाढ नोंदवली आहे.
  • महागाई(Inflation): २०२६-२७ या वर्षासाठी 'मौद्रिक धोरण समितीने (Monetary Policy Committee - MPC)' महागाईचा अंदाज ४.६% वरून वाढवून ५.१% इतका केला आहे.
  • परकीय चलन साठा (Foreign Exchange Reserves): सदर अहवालानुसार भारताचा परकीय चलन साठा १९ जून २०२६ रोजी ६७२.६ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका होता.

RBI बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात 'भारतीय रिझर्व्ह बँक' होय.
  • स्थापना वर्ष: RBI कायदा, १९३४ अंतर्गत १ एप्रिल १९३५ रोजी RBI ची स्थापना करण्यात आली होती.
  • बँक राष्ट्रीयीकरण वर्ष: १ जानेवारी १९४९ रोजी RBI राष्ट्रीयीकृत करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI चे मुख्यालय स्थित आहे.
  • सध्या कार्यरत गव्हर्नर: सध्या संजय मल्होत्रा हे RBI च्या गव्हर्नर पदावर कार्यरत आहेत.