नुकतेच प्रसिद्ध तमिळ शेफ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते दामोदरन यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे:

  • ते 'शेफ दामू' या नावाने लोकप्रिय होते.
  • तमिळनाडूतील चेन्नई येथे वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे.
  • सप्टेंबर १९५४ मध्ये चेन्नई (तमिळनाडू) येथील वेस्ट माम्बलम येथे त्यांचा जन्म झाला होता.
  •  २०२५ मध्ये त्यांना पाककलेच्या क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

शेफ दामू यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात 'तमिळनाडू टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन' मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून केली होती.
  • त्यानंतर त्यांनी पाककला क्षेत्रात एक यशस्वी कारकीर्द घडवली आहे.
  • २००४ मध्ये त्यांनी मद्रास विद्यापीठातून 'हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी' या विषयात डॉक्टरेट (PhD) पदवी मिळवतानाच असे करणारा तो पहिला भारतीय शेफ ठरला होता.
  • २०१० मध्ये त्यांनी २४ तास, ३० मिनिटे आणि १२ सेकंदात ६१७ पदार्थ (ज्यांचे एकूण वजन १९० किलो होते) तयार करून 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये आपले नाव नोंदवले होते.
  • 'विजय टीव्ही'वरील 'कुकु विथ कोमाली' या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम केल्यामुळे ते घराघरांत सुपरिचित झाले होते.