नुकतेच प्रख्यात अणुशास्त्रज्ञ आणि मार्क्सवादी विचारवंत असणाऱ्या एम.पी. परमेश्वरन यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले आहे.
ठळक मुद्दे:
- केरळमधील त्रिशूर येथे एम.पी. परमेश्वरन यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले.
- १८ जानेवारी १९३५ रोजी केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील किरालूर गावात त्यांचा जन्म झाला होता.
- ते 'केरळ शास्त्र साहित्य परिषदेशी' जोडलेले होते आणि त्यांनी भारतातील 'जन-विज्ञान' (People's science) व साक्षरता चळवळींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.
एम.पी. परमेश्वरन यांच्याबद्दल महत्वपूर्ण माहिती:
- त्यांनी १९५७ ते १९७५ या काळात महाराष्ट्रातील मुंबई येथील 'भाभा अणुसंशोधन केंद्र' (Bhabha Atomic Research Centre - BARC) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
- त्यानंतर त्यांनी विज्ञान प्रसार, तळागाळातील शिक्षण आणि जन-चळवळींकडे आपला मोर्चा वळवला.
- केरळच्या 'स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ लँग्वेजेस'मध्ये सहाय्यक संचालक म्हणून १९६९ ते १९७३ या काळात त्यांनी काम केले होते.
- २०२२ मध्ये त्यांना विज्ञान प्रसार आणि पर्यावरण संरक्षणातील योगदानाबद्दल 'केरळ श्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.