नुकतेच प्रसिद्ध भारतीय चित्रकार आणि राज्यसभेचे माजी खासदार जोगेन चौधरी यांचे ८७ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे:
- पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे त्यांचे ८७ व्या वर्षी निधन झाले आहे.
- १५ फेब्रुवारी १९३९ रोजी ब्रिटिश भारतातील बंगाल प्रेसिडेन्सीमधील फरीदपूर (सध्या बांगलादेशात) येथे त्यांचा जन्म झाला होता.
जोगेन चौधरी यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:
उल्लेखनीय शैक्षणिक / सेवा कारकीर्द:
- कला शिक्षक - हावडा जिल्हा शाळा
- डिझायनर - हँडलूम बोर्ड, कोलकाता (१९६२ पासून)
- 'कीपर ऑफ आर्ट' (कला संरक्षक) - राष्ट्रपती भवन, दिल्ली
- प्राध्यापक - 'कला भवन', विश्व-भारती विद्यापीठ, शांतिनिकेतन, पश्चिम बंगाल
राजकीय कारकीर्द:
- तृणमूल काँग्रेसचे सदस्य म्हणून राज्यसभेत पश्चिम बंगालचे प्रतिनिधित्व - कालावधी - ३ एप्रिल २०१४ ते २ एप्रिल २०२०
प्राप्त सन्मान/ पुरस्कार:
- 'प्रिक्स ले फ्रान्स द ला ज्युन पेंट्युअर' - १९६६
- हवाना द्वैवार्षिक प्रदर्शनात (सेकंड बिएनाले ऑफ हवाना) विशेष मान्यता - १९८६
- कालिदास सन्मान - २००१
- मानद 'डॉक्टर ऑफ लेटर्स' (डी.लिट.) पदवी, रवींद्र भारती विद्यापीठ, पश्चिम बंगाल - २०१०
- बंग विभूषण पुरस्कार - २०१२
- जैनुल सन्मान - २०१६