नुकतेच प्रख्यात मत्स्यशास्त्रज्ञ आणि 'केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीज (Kerala University of Fisheries and Ocean Studies - KUFOS)' चे संस्थापक कुलगुरू म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या बी. मधुसूदन कुरुप यांचे दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे:

  • केरळमधील कोची येथे बी. मधुसूदन कुरुप यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले आहे.
  • २८ नोव्हेंबर १९५४ रोजी केरळमधील तिरुवनंतपुरम येथे त्यांचा जन्म झाला होता.

बी. मधुसूदन कुरुप यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

अल्प परिचय:

  • प्रख्यात मत्स्यशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ते प्रसिद्ध होते.
  • ते विशेषतः जलचर जैवविविधता, मत्स्यपालन, मत्स्यव्यवसाय शिक्षण तसेच संशोधन क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी ओळखले जात होते.

भूषविलेली नेतृत्व पदे:

  • संस्थापक कुलगुरू - मत्स्यव्यवसाय आणि महासागर अभ्यासासाठी समर्पित असलेली भारतातील पहिली विद्यापीठ-स्तरीय संस्था 'कुफोस (KUFOS)'
  • कुलगुरू - श्री वेंकटेश्वर विद्यापीठ, उत्तर प्रदेश
  • संचालक व प्राध्यापक (१८ वर्षे) - 'कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (CUSAT)'

संशोधनातील अमूल्य योगदान:

  • पश्चिम घाटात गोड्या पाण्यातील माशांच्या ८ नवीन प्रजातींचा त्यांनी शोध लावला.
  • त्यांनी २२ डॉक्टरेट (Ph.D.) संशोधकांना मार्गदर्शन केले आहे.
  • यासोबतच त्यांनी २५० हून अधिक शोधनिबंध आणि ११ संपादित पुस्तके प्रकाशित केली आहेत.