नुकतीच भारताचे माजी क्रिकेट कर्णधार राहुल द्रविड आणि ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल यांची २०३० 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (कॉमनवेल्थ गेम्स) आयोजन समितीमध्ये (Commonwealth Games Organizing Committee)' नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • त्यांची ही नेमणूक केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे २०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या प्रस्तावित आयोजन समितीमध्ये खेळाडूंचे प्रतिनिधी म्हणून करण्यात आली आहे.
  • सदर स्पर्धा ही गुजरातच्या अहमदाबाद शहरात आयोजित केली जाणार आहे.
  • जिनाल मेहता आणि अनन्या बिर्ला यांची २०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजन समितीमध्ये खाजगी क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून शिफारस करण्यात आली आहे.
  • श्री. हर्ष संघवी (उपमुख्यमंत्री, गुजरात) हे या आयोजन समितीचे प्रमुख असतील अशी अपेक्षा आहे.
  • श्री. हरी रंजन राव (केंद्रीय क्रीडा सचिव) आणि पी. टी. उषा (अध्यक्षा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन) हे उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील.
  • श्री. एम. थेन्नारसन (प्रधान सचिव, गुजरात सरकार) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • मुख्यालयाचे ठिकाण: याचे मुख्यालय लंडन, युनायटेड किंगडम येथे स्थित आहे.
  • स्पर्धेची सुरुवात: १९३० मध्ये सदर स्पर्धेची सुरुवात झाली होती.
  • प्रथम स्पर्धा आयोजन: हॅमिल्टन, कॅनडा येथे पहिली स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
  • सध्या कार्यरत अध्यक्ष: सध्या डॉ. डोनाल्ड रुकारे हे याचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
  • आगामी २०३० ची आवृत्ती: २०३० ची आवृत्ती भारतातील अहमदाबाद, गुजरात येथे आयोजित केली जाणार आहे.