नुकतीच चेन्नई, तमिळनाडूस्थित 'रीच (REACH)' ही 'कोचॉन प्राईज (Kochon Prize) २०२६' मिळवणारी पहिली भारतीय नागरी समाज संस्था (Indian Civil Society) NGO ठरली आहे.

ठळक मुद्दे:

  • 'रिसोर्स ग्रुप फॉर एज्युकेशन अँड ॲडव्होकसी फॉर कम्युनिटी हेल्थ (Resource Group for Education and Advocacy for Community Health - REACH)' ही ना-नफा संस्था 'कोचॉन प्राईज २०२६' मिळवणारी पहिली भारतीय नागरी समाज संस्था ठरली आहे.
  • एकात्मिक तसेच लोककेंद्री आरोग्यसेवेमार्फत क्षयरोग (TB) नियंत्रणासाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
  • सदर पुरस्कार दक्षिण कोरियास्थित 'कोचॉन फाऊंडेशन (Kochon Foundation)' द्वारे, 'स्टॉप टीबी पार्टनरशिप (Stop TB Partnership)' च्या भागीदारीत, इंडोनेशिया येथे आयोजित 'स्टॉप टीबी पार्टनरशिप'च्या ४० व्या बोर्ड बैठकीदरम्यान प्रदान करण्यात आला आहे.
  • 'कोचॉन प्राईज २०२६' ची संकल्पना (Theme): 'क्षयरोगाचे लवकर निदान आणि उपचार सुधारण्यासाठी विविध आरोग्य सेवांमध्ये क्षयरोग प्रतिबंधक उपाययोजनांचे एकत्रीकरण करणे (Integrating the TB response in different health services to improve early diagnosis and treatment of people with TB.)' ही या पुरस्काराची २०२६ सालची थीम आहे.

माजी भारतीय विजेते:

  • १. एल. एस. चौहान - माजी प्रमुख, 'रिव्हाइज्ड नॅशनल टीबी कंट्रोल प्रोग्राम' (RNTCP) - २००६
  • २. 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)' - २०१७
  • ३. 'मोलबायो डायग्नोस्टिक्स (Molbio Diagnostics)' - २०२४