नुकताच नियमनविषयक तरतुदींचे पालन न केल्याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) इंडसइंड बँकेवर (IndusInd Bank) ५९.२० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
ठळक मुद्दे:
- ठेवींंवरील व्याजदर आणि प्रमाणित मालमत्तेचे रोखीकरण (Securitization of Standard Assets) यांबाबतच्या RBI च्या निर्देशांमधील काही तरतुदींचे पालन न केल्यामुळे सदर कारवाई करण्यात आली आहे.
- RBI ला प्राप्त असणाऱ्या बँकिंग नियमन कायदा (Banking Regulation Ac), १९४९ च्या कलमांन्वये अधिकारांचा वापर करून हा दंड आकारण्यात आला आहे.
इंडसइंड बँक लिमिटेडबद्दल महत्वपूर्ण माहिती:
- स्थापना वर्ष: १९९४ मध्ये इंडसइंड बँकेची स्थापना झाली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: महाराष्ट्रातील मुंबई येथे बँकेचे मुख्यालय आहे.
- बँक टॅगलाइन: 'We Make You Feel Richer' ही इंडसइंड बँकेची टॅगलाइन आहे.
RBI बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात 'भारतीय रिझर्व्ह बँक' होय.
- स्थापना वर्ष: RBI कायदा, १९३४ अंतर्गत १ एप्रिल १९३५ रोजी RBI ची स्थापना करण्यात आली होती.
- बँक राष्ट्रीयीकरण वर्ष: १ जानेवारी १९४९ रोजी RBI राष्ट्रीयीकृत करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI चे मुख्यालय स्थित आहे.
- सध्या कार्यरत गव्हर्नर: सध्या संजय मल्होत्रा हे RBI च्या गव्हर्नर पदावर कार्यरत आहेत.