भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत नुकताच 'कोस्टल लोकल एरिया बँकेला (Coastal Local Area Bank Limited)' 'अनुसूचित बँक' (Scheduled Bank) दर्जा प्रदान करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे:

  • 'कोस्टल लोकल एरिया बँक लिमिटेड' ही विजयवाडा, आंध्र प्रदेश येथे स्थित आहे.
  • भारतातील या पहिल्या 'लोकल एरिया बँकेला' रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 'RBI कायदा, १९३४' च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये अधिकृतपणे समाविष्ट केले आहे.

कोस्टल बँकेबाबतची महत्वपूर्ण माहिती:

  • RBI च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट झाल्यानंतर भारतातील पहिली लोकल एरिया बँक असलेली 'कोस्टल बँक' ही आंध्र प्रदेशात मुख्यालय असलेली एकमेव 'अनुसूचित बँक' बनली आहे.
  • बँकिंग क्षेत्रातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मनाला जातो.
  • या स्थित्यंतरामुळे तिची संस्थात्मक स्थिती बळकट होऊन भविष्यातील विस्तारास मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.

RBI बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात 'भारतीय रिझर्व्ह बँक' होय.
  • स्थापना वर्ष: RBI कायदा, १९३४ अंतर्गत १ एप्रिल १९३५ रोजी RBI ची स्थापना करण्यात आली होती.
  • बँक राष्ट्रीयीकरण वर्ष: १ जानेवारी १९४९ रोजी RBI राष्ट्रीयीकृत करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI चे मुख्यालय स्थित आहे.
  • सध्या कार्यरत गव्हर्नर: सध्या संजय मल्होत्रा हे RBI च्या गव्हर्नर पदावर कार्यरत आहेत.