कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (Managing Director and Chief Executive Officer) म्हणून अनूप कुमार साहा यांच्या नियुक्तीला भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) मंजुरी मिळाली आहे.

ठळक मुद्दे:

  • कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने अनूप कुमार साहा यांची बँकेचे पुढील व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.
  • ते १ जानेवारी २०२७ पासून ३ वर्षांच्या कालावधीसाठी पदभार स्वीकारतील.
  • ते अशोक वासवानी यांची जागा घेतील.

इतर महत्वपूर्ण नियुक्त्या:

  • महेश मुरलीधर पै यांची १ ऑक्टोबर २०२६ पासून पी. आर. शेषाद्री यांच्या जागी साउथ इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • केंद्र सरकारमार्फत 'न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडच्या (New India Assurance Company Limited - NIACL)' अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून लावण्या आर. मुंडयूर यांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली आहे.

RBI बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात 'भारतीय रिझर्व्ह बँक' होय.
  • स्थापना वर्ष: RBI कायदा, १९३४ अंतर्गत १ एप्रिल १९३५ रोजी RBI ची स्थापना करण्यात आली होती.
  • बँक राष्ट्रीयीकरण वर्ष: १ जानेवारी १९४९ रोजी RBI राष्ट्रीयीकृत करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI चे मुख्यालय स्थित आहे.
  • सध्या कार्यरत गव्हर्नर: सध्या संजय मल्होत्रा हे RBI च्या गव्हर्नर पदावर कार्यरत आहेत.