भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत 'फिनो पेमेंट्स बँकेच्या (Fino Payments Bank)' व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी प्रताप सिंग यांच्या नियुक्तीला ३ वर्षांसाठी मंजुरी देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- सदर नियुक्ती ही २७ नोव्हेंबर २०२६ पासून किंवा त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून (यापैकी जे आधी असेल) प्रभावी होईल.
- प्रताप सिंग हे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी केतन मर्चंट यांची जागा घेतील.
- ऋषी गुप्ता यांनी मे २०२६ मध्ये स्वेच्छेने लवकर निवृत्ती घेतल्यावर केतन मर्चंट यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती.
प्रताप सिंग यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:
- त्यांना भारत आणि युनायटेड किंगडममध्ये बँकिंग क्षेत्रातील २९ वर्षांहून अधिक अनुभव आहे.
महत्त्वाची पदे:
- प्रमुख - ICICI बँक यूके मध्ये यूके आणि युरोपसाठी 'रिटेल अँड एसएमई बँकिंग' प्रमुख
विविध जबाबदाऱ्या:
- ICICI बँक इंडिया
- ICICI बँक यूके
- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यूके