नुकतीच RBI मार्फत परकीय चलन आणि वित्तीय बाजारपेठ नियमन विभागांच्या (Forex and Financial Markets Regulation) देखरेखीसाठी मनीषा चक्रवर्ती यांची कार्यकारी संचालक (Executive Director - ED) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- ३ ऑगस्ट २०२६ पासून भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे (Reserve Bank of India - RBI) मनीषा चक्रवर्ती यांची कार्यकारी संचालक (ED) म्हणून नियुक्ती करणीत आली आहे.
- त्या परकीय चलन विभाग (Foreign Exchange Department - FED) आणि वित्तीय बाजारपेठ नियमन विभाग (Financial Markets Regulation Department - FMRD) यांच्या कामकाजावर देखरेख करतील.
मनीषा चक्रवर्ती यांच्याबद्दल थोडक्यात महत्वपूर्ण माहिती::
- RBI मध्ये त्यांना ३ दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे.
- त्या नियामक कार्ये, कार्यान्वयनविषयक जबाबदाऱ्या आणि मध्यवर्ती बँकेच्या कामकाज याबाबत निष्णात आहेत.
- आपल्या RBI मधील कारकिर्दीत त्यांनी RBI च्या पर्यवेक्षण विभाग, परकीय चलन विभाग आणि सरकारी व बँक खाती विभाग यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये काम केले आहे.
- या पदावर पदोन्नती मिळण्यापूर्वी त्या RBI च्या पर्यवेक्षण विभागात 'चीफ जनरल मॅनेजर-इन-चार्ज (Chief General Manager-in-Charge)' म्हणून कार्यरत होत्या.
RBI बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात 'भारतीय रिझर्व्ह बँक' होय.
- स्थापना वर्ष: RBI कायदा, १९३४ अंतर्गत १ एप्रिल १९३५ रोजी RBI ची स्थापना करण्यात आली होती.
- बँक राष्ट्रीयीकरण वर्ष: १ जानेवारी १९४९ रोजी RBI राष्ट्रीयीकृत करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI चे मुख्यालय स्थित आहे.
- सध्या कार्यरत गव्हर्नर: सध्या संजय मल्होत्रा हे RBI च्या गव्हर्नर पदावर कार्यरत आहेत.