नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या QS शाश्वतता क्रमवारी (Quacquarelli Symonds Sustainability Rankings) २०२७ मध्ये नवी दिल्ली येथील 'भारतीय तंत्रज्ञान संस्था (Indian Institute of Technology - IIT ), दिल्ली' ही जागतिक स्तरावरील पहिल्या २०० विद्यापीठांमध्ये १९४ वे स्थान मिळवणारी एकमेव भारतीय संस्था ठरली आहे.

ठळक मुद्दे:

  • स्वीडनच्या लुंड युनिव्हर्सिटीचे अव्वल स्थान कायम राहिले आहे.
  • जागतिक उच्च शिक्षण तज्ज्ञ संस्था 'क्वाक्वेरेली सायमंड्स' (Quacquarelli Symonds - QS) मार्फत 'QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज: शाश्वतता क्रमवारी' ची ५ वी आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.
  • या क्रमवारीत ८६.५ गुणांसह IIT-दिल्लीने जागतिक स्तरावर १९४ वे स्थान पटकावले आहे.
  • गेल्या वर्षीच्या क्रमवारीत ही संस्था २०५ व्या क्रमांकावर होती.

अव्वल संस्था - क्रमवारी:

  • १. लुंड युनिव्हर्सिटी, स्वीडन
  • २. ETH झुरिच, स्वित्झर्लंड
  • ३. युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो, कॅनडा
  • ४. युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा
  • ५. युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया
  • ६. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, अमेरिका
  • ७. युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज
  • ८. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले, अमेरिका
  • ९. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, युनायटेड किंगडम आणि युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न, ऑस्ट्रेलिया