आसामचे भारतीय 'लॉन बॉल्स (lawn bowls)' खेळाडू पुतुल सोनोवाल यांनी ऑस्ट्रेलियातील बरहॅम येथे आयोजित 'वर्ल्ड बॉल्स चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स (World Bowls Champion of Champions)' स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी गटात कांस्यपदक जिंकले आहे.

ठळक मुद्दे:

  • या स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक जिंकून देत त्यांनी इतिहास घडवला आहे.
  • ते असे करणारे पहिले भारतीय खेळाडू ठरले आहेत.
  • स्कॉटलंडचे अनुभवी खेळाडू इयान मॅकलीन यांच्याशी उपांत्य फेरीत पुतुल सोनोवाल यांचा सामना झाला ज्यात त्यांना पराभव पत्करावा लागला.

'वर्ल्ड बॉल्स चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स २०२६' बाबत महत्वपूर्ण माहिती:

  • ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स येथे ही स्पर्धा ६ ते १० ऑक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
  • लॉन बॉल्स खेळाची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था असणाऱ्या 'वर्ल्ड बॉल्स (World Bowls)' या संस्थेच्या देखरेखीखाली ही स्पर्धा आयोजित केली जाते.
  • सदर स्पर्धेत ३५ देशांतील ३४ पुरुष आणि २८ महिला खेळाडूंनी भाग घेतला होता.

लॉन बॉल्स (Lawn bowls) खेळाबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्णतः अचूकतेवर आधारित असा हा खेळ असून तो गवत किंवा कृत्रिम मैदानावर खेळला जातो.
  • खेळाडू विशिष्ट आकाराचे चेंडू यात एका लक्ष्याकडे अर्थात 'जॅक (jack)' कडे लोळवत नेतात.
  • 'वर्ल्ड बॉल्स' ही स्कॉटलंडमधील एडिनबर्ग येथे मुख्यालय असणारी या खेळाची प्रशासकीय संस्था आहे.