नुकतीच प्रा. अच्युत सामंत यांची 'इंडियन युनिस्पोर्ट फेडरेशनच्या (Indian UniSport Federation - IUSF)' पहिल्या अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 'इंडियन युनिस्पोर्ट फेडरेशन'च्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रा. अच्युत सामंत यांची संघटनेच्या पहिल्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
- ते 'कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी' आणि 'कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस' चे संस्थापक आहेत.
प्रा. अच्युत सामंत यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:
- २०१८ मध्ये त्यांनी ओडिशातून राज्यसभेचे खासदार आणि त्यानंतर 'बिजू जनता दला'तर्फे कंधमाल मतदारसंघातून लोकसभेचे खासदार (२०१९-२०२४) म्हणून काम पाहिले होते.
- त्यांनी 'विद्यापीठ अनुदान आयोग (University Grants Commission - UGC)' आणि 'अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (All India Council for Technical Education - AICTE)' कार्यकारी समित्यांवरही काम केले आहे.
- या दोन्ही संस्थांवर एकाच वेळी काम करणारे ते पहिले ओडिया व्यक्ती ठरले आहेत.
प्राप्त पुरस्कार आणि सन्मान:
- 'गुसी पीस प्राइज इंटरनॅशनल' (२०१४)
- 'बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार' (२०१६)
- 'इंटरनॅशनल सोशल अवॉर्ड' (International Social Award - ISA) (२०१५) - बहरीन राज्य
- सर्वोत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार - मंगोलिया प्रजासत्ताक