नुकतेच IFS अधिकारी प्रशांत अग्रवाल यांनी लिहिलेल्या 'ब्रिंगिंग द चीता बॅक टू इंडिया: हाऊ डिप्लोमसी मेड कन्झर्व्हेशन'ज बिग मिशन पॉसिबल (Bringing the Cheetah Back to India: How Diplomacy Made Conservation’s Big Mission Possible)' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
ठळक मुद्दे:
- अग्रवाल हे १९९८ च्या बॅचचे मध्य प्रदेश केडरचे भारतीय वन सेवा (Indian Forest Service - IFS) अधिकारी आहेत.
- भारतात चित्त्यांचे पुनरागमन आणि संवर्धन करण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा प्रवास मांडणारे हे पुस्तक 'हॅचेट इंडियाद्वारे (Hachette India)' प्रकाशित करण्यात आले आहे.
- सदर पुस्तक हे संवर्धन उपक्रमांमध्ये मुत्सद्देगिरी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्व स्पष्ट करते.
- त्याचबरोबर 'प्रोजेक्ट चीतामधील (Project Cheetah)' पडद्यामाच्या वाटाघाटी, व्यवस्थापन आणि धोरणात्मक प्रयत्नांची माहिती देते.