प्रशांत महापात्रा (Prasanta Mahapatra) यांनी नुकताच भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाच्या (Securities and Exchange Board of India - SEBI) कार्यकारी संचालक पदाचा पदभार स्वीकारला आहे.
ठळक मुद्दे:
- प्रशांत महापात्रा यांनी हा पदभार स्वीकारल्यानंतर ते 'कॉर्पोरेशन फायनान्स इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट' (Corporation Finance Investigation Department - CFID) आणि 'रिकव्हरी अँड रिफंड डिपार्टमेंट' (Recovery and Refund Department - RRD) या विभागांचे कामकाज पाहतील.
प्रशांत महापात्रा यांच्याबद्दल थोडक्यात:
- ते एप्रिल १९९९ मध्ये सेबीमध्ये रुजू झाले होते.
- त्यांना 'सिक्युरिटीज मार्केटचे नियमन आणि पर्यवेक्षण(securities market regulation and supervision)' या क्षेत्रातील २७ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे.
- आपल्या कार्यकाळात त्यांनी विविध विभागांमध्ये काम केले आहे.
- सेबीच्या कोलकाता (पश्चिम बंगाल) येथील 'ईस्टर्न रिजनल ऑफिस' (ERO) मध्ये काम, विविध देशांतर्गत धोरण-निर्मिती व सल्लागार समित्यांचे सदस्यपद त्याचबरोबर सेबीमध्ये 'चीफ जनरल मॅनेजर(CGM)' म्हणून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.
SEBI बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव: SEBI - Securities and Exchange Board of India अर्थात भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ.
- स्थापना वर्ष: १२ एप्रिल १९८८ रोजी एक बिगर-वैधानिक संस्था म्हणून स्थापना.
- वैधानिक दर्जा प्राप्त वर्ष: ३० जानेवारी १९९२ रोजी 'सेबी कायदा, १९९२' अंतर्गत सेबीला वैधानिक अधिकार प्रदान करण्यात आले.
- मुख्यालय: SEBI चे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे.