'पॉल मर्चंट्स फायनान्स (Paul Merchants Finance)' ही केवळ चांदीवर कर्ज देणाऱ्या (Silver Loan) विशेष शाखा सुरू करणारी भारतातील पहिली बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी (Non-Banking Financial Company - NBFC) ठरली आहे.
ठळक मुद्दे:
- 'पॉल मर्चंट्स ग्रुप'चा भाग असणाऱ्या तसेच विविध आर्थिक सेवा पुरवणाऱ्या बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी (Non-Banking Financial Company - NBFC) 'पॉल मर्चंट्स फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडमार्फत' (Paul Merchants Finance Private Limited - PMFPL) नुकतीच 'चांदीवर कर्ज' (Loan Against Silver) देण्याची योजना सुरू केली.
- मुख्य बाब म्हणजे केवळ चांदीवर कर्ज देण्यासाठी विशेष शाखा सुरू करणारी ती भारतातील पहिली NBFC ठरली आहे.
- भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) 'सोने आणि चांदीच्या तारण मालमत्तेवर कर्ज देण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना, २०२५' (Lending Against Gold and Silver Collateral Directions) च्या अनुषंगाने सदर उपक्रम राबवण्यात आला आहे.
- या मार्गदर्शक सूचनांमुळे पात्र चांदीच्या तारणावर कर्ज देण्याची प्रक्रिया औपचारिक आणि नियंत्रित कर्जपुरवठा प्रणालीच्या कक्षेत आली आहे.
PMFPL बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- स्थापना वर्ष: २०१० मध्ये PMFPL ची स्थापना करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: चंदीगड येथे PMFPL चे मुख्यालय स्थित आहे.
- सेवा पुरवठा: सदर कंपनी ही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी सुरक्षित कर्ज, मालमत्तेवर कर्ज आणि कॉर्पोरेट कर्ज यांसारख्या विविध सेवा पुरवते.