नुकतीच झांसी येथील 'परिच्छा वेअर'ला 'आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचराविषयक आयोगामार्फत (International Commission on Irrigation and Drainage - ICID)' 'जागतिक वारसा सिंचन संरचना (World Heritage Irrigation Structure)' म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • 'आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचराविषयक आयोगामार्फत (International Commission on Irrigation and Drainage - ICID)' उत्तर प्रदेशातील झांसी येथील १४० वर्षे जुन्या 'परिच्छा वेअर'ला (Parichha Weir) 'जागतिक वारसा सिंचन संरचना' (World Heritage Irrigation Structure - WHIS) ​​म्हणून घोषित करण्यात आले आहे.
  • सदर मान्यता ही बेतवा नदीवरील 'बेतवा कालवा प्रणाली'चे मुख्य जल-नियंत्रण केंद्र म्हणून त्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशमधील सिंचनास आधार देण्यातील त्याची निरंतर भूमिका लक्षात घेऊन देण्यात आली आहे.
  • या पुरस्कारांचे औपचारिक वितरण ऑक्टोबर २०२६ मध्ये फ्रान्समधील मार्सेली (Marseille) येथे होणाऱ्या २६ व्या ICID आंतरराष्ट्रीय परिषद आणि ७७ व्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषद बैठकीदरम्यान करण्यात येणार आहे.

परिच्छा वेअरची ठळक वैशिष्ट्ये व इतर बाबी:

  • दगडी बांधकामाचा हा परिच्छा वेअर १,१७४ मीटर लांब असून नदीपात्रापासून १६.८ मीटर इतका उंच आहे.
  • यामध्ये ३१८ स्टील 'फॉलिंग शटर्स' बसवण्यात आले असून यामुळे जलाशयाची क्षमता १,७०० दशलक्ष घनफुटांवरून २,४०० दशलक्ष घनफूट इतकी वाढली आहे.
  • WHIS पुरस्कार २०२६ साठी भारतातील इतर ३ सिंचन संरचनांची निवड करण्यात आली आहे - आष्टी मध्यम प्रकल्प (महाराष्ट्र), छापावारा धरण (राजस्थान) आणि पेचीपराई धरण (तमिळनाडू).