सुप्रसिद्ध पद्मश्री कथक नृत्यांगना रोशन कुमारी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे:
- पद्मश्री पुरस्कार विजेत्या रोशन कुमारी यांचे महाराष्ट्रातील मुंबई येथे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले.
- कथकच्या 'जयपूर घराण्यातील' एक प्रमुख कलाकार असणाऱ्या तया प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय नृत्यांगना तसेच नृत्यदिग्दर्शिका होत्या.
- २४ डिसेंबर १९३७ रोजी अंबाला, हरियाणा येथे त्यांचा जन्म झाला होता.
- १९८४ मध्ये कला क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान 'पद्मश्री' प्रदान करण्यात आला होता.
रोशन कुमारी यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:
- त्या फकीर मोहम्मद (प्रसिद्ध तालवाद्यवादक) आणि झोहराबाई अंबालेवाली (शास्त्रीय व पार्श्वगायिका) यांची कन्या होत्या.
- त्या विशेषतः आपल्या सादरीकरण, नृत्यदिग्दर्शन तसेच अध्यापनासाठी ओळखल्या जात होत्या.
प्राप्त सन्मान/ पुरस्कार:
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार
- विश्व उन्नयन संसद (१९८९)
- महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०)
- मान-पत्र सन्मान (१९९३)