नुकतेच पद्मश्री पुरस्कार विजेते आणि मृदंगम वादक गुरूवायूर दोराई यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे:
- गुरूवायूर दोराई हे कर्नाटक संगीतात वापरल्या जाणाऱ्या मृदंगमचे (दुहेरी मुखाच्या तालवाद्य) प्रख्यात वादक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते म्हणून सुप्रसिद्ध होते.
- चेन्नई, तामिळनाडू येथे त्यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले आहे.
- २ जुलै १९३५ रोजी केरळमधील गुरूवायूर येथे त्यांचा जन्म झाला होता.
- कर्नाटक संगीत आणि मृदंगम वादन याबाबतच्या त्यांच्या जवळपास ८ दशकांच्या असाधारण योगदानाबद्दल त्यांना २०२५ मध्ये कला क्षेत्रातील 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
- एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्यासाठी त्यांनी नियमित मृदंगम वादक म्हणून करतानाच अनेक दिग्गज गायक व वादकांसोबत सादरीकरण केले होते.
प्राप्त पुरस्कार:
- कलाईमामणी पुरस्कार (१९९०)
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९९६)