नुकतेच पद्मश्री पुरस्कार विजेते आणि सतार वादक पंडित मणिलाल नाग यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे:

  • ते हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील 'विष्णुपूर घराण्या'चे दिग्गज कलाकार, प्रसिद्ध सतार वादक तसेच पद्मश्री पुरस्कार विजेते म्हणून प्रसिद्ध होते. 
  • त्यांचे पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे ८७ व्या वर्षी निधन झाले आहे.
  • १६ ऑगस्ट १९३९ रोजी पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे त्यांचा जन्म झाला होता.

पंडित मणिलाल नाग यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • आपले वडील आणि विष्णुपूर घराण्याचे ख्यातनाम कलाकार संगीताचार्य गोकुल नाग यांच्याकडून त्यांनी सितार वादनाचे सुरुवातीचे धडे गिरवले होते.
  • १९५४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा जाहीर सादरीकरण केले होते.
  • पुढे ते या घराण्याचे एक अग्रगण्य कलाकार म्हणून नावारूपाला आले होते.

प्राप्त पुरस्कार आणि सन्मान:

  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार - २००१
  • सीनिअर फेलोशिप - २००५
  • मानद सुवर्णपदक, एशियाटिक सोसायटी, कोलकाता - २००८
  • 'अलाउद्दीन पुरस्कार' (२०१२) आणि 'बंग विभूषण' (२०१५) - पश्चिम बंगाल सरकार
  • 'पद्मश्री पुरस्कार' - २०२०