केरळमधील पारंपारिक भात वाणांचे जतन करणारे आणि 'नेल्लाचन' (भाताचे जनक), 'रामेत्तान', 'स्थानिक भात वाणांचे संरक्षक' तसेच 'जिवंत भात जनुक बँक' म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री पुरस्कार विजेते चेरुवयाल रमन यांचे दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे:
- त्यांचे केरळमध्ये ७४ व्या वर्षी निधन झाले आहे.
- ६ जून १९५२ रोजी केरळमधील वायनाड जिल्ह्यातील कम्माना गावात त्यांचा जन्म झाला होता.
- २०२३ मध्ये चेरुवयाल रमन यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'पद्मश्री' देऊन सन्मानित करण्यात आले होते.
चेरुवयाल रमन यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:
- पारंपारिक शेतीद्वारे भाताच्या ४५ हून अधिक वाणांचे जतन करण्यासाठी चेरुवयाल रमन यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते.
- त्यांनी वायनाडमधील कम्माना येथे असलेल्या आपल्या ३ एकर शेतात ही लागवड केली होती.
- त्यांनी यासोबतच रासायनिक खतमुक्त शेती तसेच स्थानिक कृषी जैवविविधतेचाही प्रसार केला होता.
प्राप्त पुरस्कार:
- राष्ट्रीय वनस्पती जीनोम रक्षक पुरस्कार (National Plant Genome Saviour Award) - २०१६
- पहिला 'उम्मेन चांडी मेमोरियल अवॉर्ड (Oommen Chandy Memorial Award)' - २०२५