पद्मश्री पुरस्कार विजेते आणि हृदयरोगतज्ज्ञ जी. विजयराघवन यांचे नुकतेच वयाच्या ८४ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे:

  • केरळमधील तिरुवनंतपुरम येथे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. गोविंदन (जी.) विजयराघवन यांचे निधन झाले आहे.
  • ते ८४ वर्षांचे होते.
  •  १८ सप्टेंबर १९४२ रोजी केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील पेरुमपुझा येथे त्यांचा जन्म झाला होता.
  • वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना २००९ मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

जी. विजयराघवन यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी तिरुवनंतपुरम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारतातील पहिली '२डी इकोकार्डिओग्राफी (2D echocardiography)' प्रयोगशाळा सुरू केली होती. 
  • यासोबतच शस्त्रक्रियेशिवाय केली जाणारी हृदयविकार निदानाची (Non-invasive cardiac diagnosis) पद्धत विकसित करण्यात त्यांनी मोलाची भर घातली आहे.
  • २००२ मध्ये त्यांनी तिरुवनंतपुरम येथे 'केरळ वैद्यकीय विज्ञान संस्था (Kerala Institute of Medical Sciences - KIMS)' रुग्णालयाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
  • त्यांनी जवळपास २० हून अधिक 'डिप्लोमेट ऑफ नॅशनल बोर्ड (Diplomates of the National Board - DNB)' अभ्यासक्रम सुरू करण्यास मदत केली होती.