नुकतेच पद्मभूषण पुरस्कार विजेते भौतिकशास्त्रज्ञ दीपक धर यांना 'डिरॅक मेडल (Dirac Medal) २०२६' प्रदान करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- सैद्धांतिक आणि सांख्यिकीय यांत्रिकीमधील उत्कृष्ट योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कारप्राप्त सुप्रसिद्ध भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ प्रा. दीपक धर यांना 'आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकशास्त्र केंद्रामार्फत (International Centre for Theoretical Physics - ICTP)' २०२६ सालच्या 'डिरॅक मेडलने (Dirac Medal)' सन्मानित करण्यात आले आहे.
- डिरॅक मेडल मिळवणारे ते पहिले भारतीय भौतिकशास्त्रज्ञ ठरले आहेत.
- त्यांनी सदर पुरस्कार फ्रान्सचे बर्नार्ड डेरिडा, इटलीचे मार्क मेझार्ड आणि इस्रायल व अमेरिकेचे हाइम सोम्पोलिन्स्की यांच्यासोबत विभागून घेतला आहे.
- डिरॅक मेडल प्रशस्तिपत्र हे संतुलित आणि असंतुलित सांख्यिकीय यांत्रिकी, ऑप्टिमायझेशन, सैद्धांतिक न्यूरोसायन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता इ. क्षेत्रांतील योगदानासाठी देण्यात येते.
दीपक धर यांच्याबद्दल महत्वपूर्ण माहिती:
- ते सांख्यिकीय भौतिकशास्त्र, स्टोकास्टिक प्रक्रिया आणि प्रावस्था संक्रमणाच्या अभ्यासातील त्यांच्या अग्रगण्य योगदानासाठी ओळखले जाणारे एक प्रख्यात भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आहेत.
- त्यांनी मुंबईमधील 'टाटा मूलभूत संशोधन संस्था(Tata Institute of Fundamental Research - TIFR)' तसेच पुण्यातल्या 'भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (Indian Institute of Science Education and Research - IISER) प्राध्यापक म्हणून काम केले आहे.