नुकतीच पद्म पुरस्कार विजेता भारताचा माजी कप्तान एम. एस. धोनीमार्फत IPL मधून निवृत्ती जाहीर करण्यात आली असून त्याची २०२७ च्या IPL हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे 'मार्गदर्शक (Mentor)' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

ठळक मुद्दे:

  • यासोबत त्याचा २००८ मध्ये सुरू झालेला IPL मधील खेळाडू म्हणून प्रवास अधिकृतपणे संपुष्टात आला आहे.

एम. एस. धोनी - आयपीएल कारकिर्दीबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • एकूण १९ IPL हंगाम - १७ हंगाम CSK साठी आणि २ हंगाम रायझिंग पुणे सुपरजायंट (RPS) साठी
  • २७८ सामन्यांत ३८.३० ची सरासरी ५,४३९ धावा केल्या (२४ अर्धशतके)
  • CSK साठी ४,८६५ धावा
  • आयपीएलमध्ये एकूण २६४ षटकार आणि ३७५ चौकार

उल्लेखनीय कामगिरी:

  • त्याच्या नेतृत्वाखाली CSK ने ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद (२०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३) आणि २ वेळ चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-२० चे विजेतेपद (२०१० आणि २०१४) पटकावले.
  • कर्णधार म्हणून त्याने IPL मध्ये विक्रमी १३६ विजय मिळवले असून CSK ला १० वेळा IPL च्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवले आहे.

प्राप्त पुरस्कार/ सन्मान:

  • पद्मश्री पुरस्कार - २००९
  • पद्मभूषण - २०१८