नुकतेच पद्म पुरस्कार विजेते आणि प्रख्यात शास्त्रज्ञ पल्ले राम राव यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे:

  • प्रसिद्ध धातूशास्त्रज्ञ, पद्म पुरस्कार विजेते आणि हैदराबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक पल्ले राम राव यांचे तेलंगणातील हैदराबाद येथे वयाच्या ८९ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.

भूषविलेली पदे:

  • अध्यक्ष - अणुऊर्जा नियामक मंडळाचे (Atomic Energy Regulatory Board)
  • सदस्य - अणुऊर्जा आयोगाचे (Atomic Energy Commission)
  • सचिव - विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे (Department of Science and Technology)
  • कुलगुरू - हैदराबाद विद्यापीठ (१९९९ ते २००२)

पल्ले राम राव यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • ३० जून १९३७ रोजी आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे त्यांचा जन्म झाला होता.
  • राव हे प्रतिष्ठित भारतीय धातूशास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक होते. 
  • ते भौतिक आणि यांत्रिक धातूशास्त्रातील त्यांच्या योगदानासाठी ओळखले जात होते.
  • त्यांनी आंतरविद्याशाखीय संशोधन व संस्थात्मक विकासाला चालना दिली होती.