नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 'उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम परिषद (Emerging Science, Technology and Innovation Conclave - ESTIC)' २०२६ च्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- २७ ते २९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे भारताचा हा प्रमुख वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
- संकल्पना/ विषय (Theme): 'सर्जनशील मने, विज्ञानाला चालना, तंत्रज्ञानाचे सक्षमीकरण (Creative Minds, Catalyzing Science, Empowering Technologies)' या संकल्पनेवर हा कार्यक्रम आधारित होता.
- हा कार्यक्रम विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 'वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (Council of Scientific and Industrial Research - CSIR)' द्वारे, 'सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इंटरडिसिप्लिनरी सायन्स अँड टेक्नॉलॉजी (CSIR-National Institute for Interdisciplinary Science and Technology - CSIR-NIIST)' च्या भागीदारीत आयोजित करण्यात आला होता.