पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामनाथ कोविंद यांच्या 'ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक' या आत्मचरित्राचे प्रकाशन

ठळक मुद्दे:

  • नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या 'ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक: माय लाईफ, माय स्ट्रगल्स (Triumph of the Indian Republic: My Life, My Struggles)' या आत्मचरित्राचे प्रकाशन केले.
  • सदर पुस्तक हे रामनाथ कोविंद यांच्या आयुष्यातील विविध अनुभवांवर प्रकाश टाकते त्यासोबतच तरुणांना सोशल मीडियाच्या प्रभावाखालील 'शॉर्टकट संस्कृती' टाळण्यासाठी प्रोत्साहित करते.

आत्मचरित्राविषयी थोडक्यात महत्वाचे:

  • 'रूपा पब्लिकेशन्सद्वारे' (Rupa Publications) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.
  • या पुस्तकात कोविंद यांचा जीवनप्रवास, जनसेवा, राजकीय कारकीर्द आणि २०१७ ते २०२२ या कालावधीत भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून झालेले कार्य व त्यांना आलेला अनुभव यांचा आढावा घेण्यात आला आहे.
  • या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी चिकाटी, शिक्षण, लोकशाही मूल्ये आणि राष्ट्रसेवा यांचे महत्त्व समजून घेण्यास तरुणांना प्रेरित केले आहे.