नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत नवी दिल्लीत पहिल्या ''शांघाय सहकार्य संघटना (Shanghai Cooperation Organisation - SCO) सभ्यता संवाद मंचा'चे (Civilisational Dialogue Forum) उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील 'पुराणा किल्ला' येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या 'शांघाय सहकार्य संघटना सभ्यता संवाद मंचा'चे उद्घाटन केले आहे.
  • ३ दिवस चाललेला हा कार्यक्रम २० ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पार पडला आहे.
  • या मंचाच्या समारोपाच्या वेळी १२ कलमी 'इंद्रप्रस्थ जाहीरनामा (Indraprastha Communiqué)' स्वीकारण्यात आला आहे.