नवी दिल्ली येथे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 'सेमिकॉन इंडिया (SEMICON India) २०२६'चे उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • नवी दिल्ली येथे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी 'इंडिया सेमिकंडक्टर मिशन' (ISM), 'इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय' (MeitY) आणि 'SEMI' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'सेमिकॉन इंडिया (SEMICON India) २०२६'च्या पाचव्या आवृत्तीचे उद्घाटन केले आहे.
  • भारताच्या सेमिकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स परिसंस्थेवर केंद्रित असलेल्या या ३ दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे.
  • सदर कार्यक्रम हा १७ ते १९ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
  • सेमिकंडक्टर कंपन्या, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, संशोधन संस्था, स्टार्टअप्स, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच विद्यार्थी यांचा यामध्ये सहभाग असणार आहे.
  • २०२६ सालची संकल्पना /थीम (Theme): 'सिलिकॉन ते सिस्टिम्स: परिसंस्थेची उभारणी (Silicon to Systems: Building the Ecosystem)' ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे.