पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच नवी दिल्ली येथे 'राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामार्फत (National Green Tribunal - NGT)' आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- परिषद संकल्पना/ थीम (Theme): 'पर्यावरण आणि हवामान गतिमानतेचे भविष्य (The Future of Environment and Climate Dynamics)' या विषयावर नवी दिल्ली येथे 'राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामार्फत (National Green Tribunal - NGT)' आयोजित करण्यात आलेली ही परिषद आधारित होती.
- माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्षस्थानी विराजमान होते.
- ही परिषद १९ ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आली होती.
- २ दिवस चाललेल्या या कार्यक्रमात १७ देशांतील न्यायाधीश, पर्यावरणतज्ज्ञ तसेच सरकारी आणि न्यायालयीन अधिकारी सहभागी झाले होते.
- आगामी पर्यावरण आणि हवामानविषयक समस्या, पर्यावरणीय न्याय, हवामान प्रशासन आणि पर्यावरण संरक्षणातील संस्थात्मक योगदान यांवरील चर्चेसाठी ही परिषद समर्पित करण्यात आली होती.
परिषदेच्या मुख्य विषयांमध्ये समाविष्ट बाबी:
- हवामान बदल आणि लवचिकता
- चक्रिय अर्थव्यवस्था
- शाश्वत ऊर्जा उपाय
- जैवविविधता आणि परिसंस्था