नुकताच प्रसार भारती मधील अभियंता नोंगमाईथेम नंदकुमार सिंग यांना प्रसारण तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांमधील योगदानाबद्दल 'एशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग एक्सलन्स अवॉर्ड (Asia-Pacific Broadcasting Union Broadcast Engineering Excellence Award) २०२६' प्रदान करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे:
- माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे (MIB) अवर सचिव मिहिर कुमार झा यांनी सिंग यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला आहे.
- हा पुरस्कार प्रदान करणारी 'एशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन' ही संस्था ६६ देशांमधील सुमारे २२४ प्रसारण आणि माध्यम संस्थांची बनलेली आहे.
- ६३ वी 'ABU जनरल असेंब्ली' आणि संबंधित बैठका ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२६ या काळात श्रीलंकेतील कोलंबो येथे पार पडल्या आहेत.
- २०२६ सालची महासभेची संकल्पना: 'शांतता आणि मानवतेसाठी माध्यम: सत्य, विश्वास आणि परिवर्तन (Media for Peace and Humanity: Truth, Trust, and Transformation)' ही या महासभेची २०२६ सालची संकल्पना होती.