नुकतेच ऑस्कर विजेत्या अभिनेत्री इव्हा मेरी सेंट यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले आहे.

ठळक मुद्दे:

  • ऑस्कर विजेत्या अभिनेत्री इव्हा मेरी सेंट या हॉलिवूडच्या १९४० आणि १९५० च्या दशकातील 'सुवर्णयुगा'तील शेवटच्या काही हयात तारकांपैकी एक होत्या.
  • अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे त्यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले आहे. 
  • १९२४ मध्ये नेवार्क, न्यू जर्सी (अमेरिका) येथे त्यांचा जन्म झाला होता.

इव्हा मेरी सेंट यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

प्रसिद्ध भूमिका:

  • अल्फ्रेड हिचकॉक यांच्या १९५९ मधील 'नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट' या क्लासिक थ्रिलर चित्रपटात कॅरी ग्रांट यांच्यासोबत साकारलेली 'ईव्ह केंडल' ही भूमिका सेंट यांच्या कारकिर्दीतील सर्वात गाजलेल्या भूमिकांपैकी एक मानली जाते.

प्राप्त पुरस्कार/सन्मान:

  • १९५५ मध्ये 'ऑन द वॉटरफ्रंट (१९५४)' या आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री' श्रेणीतील अकॅडमी अवॉर्ड अर्थात ऑस्कर पुरस्कार जिंकला होता.
  • 'पीपल लाइक अस' या मिनी-सीरीजसाठी एमी अवॉर्ड (१९९०)
  • ब्रॉडवेवरील 'ट्रिप टू बाउंटिफुल'साठी ड्रामा क्रिटिक्स अवॉर्ड (१९५३)
  • 'द लेजेंड ऑफ कोरा' (२०१२-१४) ॲनिमेटेड मालिका - 'बिहाईंड द व्हॉइस ॲक्टर्स'चा 'व्हॉइस ॲक्टिंग अवॉर्ड'