नुकतीच ओडिया कवी आशुतोष परिडा यांची 'बिश्वास दे पृथ्वी' (Bishwas De Pruthwi)' या काव्यसंग्रहासाठी ४७ व्या 'सरला पुरस्कारासाठी (Sarala Puraskar)' निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • सुप्रसिद्ध ओडिया कवी, निबंधकार तसेच माजी शास्त्रज्ञ आशुतोष परिडा यांची 'बिश्वास दे पृथ्वी' (२०२४) या काव्यसंग्रहासाठी ४७ व्या 'सरला पुरस्कारा'साठी निवड करण्यात आली आहे.
  • २५ ऑक्टोबर २०२६ रोजी भुवनेश्वर, ओडिशा येथे आयोजित एका समारंभात सदर पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
  • ओडिसी नृत्यगुरू दुर्गा चरण रणबीर आणि शिल्पकार दामोदर बेहरा यांना कला क्षेत्रातील आजीवन उत्कृष्ट कामगिरीसाठीचा २०२६ सालचा 'इला-बन्सीधर पांडा कला सन्मान' प्रदान करण्यात आला.

'सरला पुरस्कारा'विषयी माहिती:

  • ओडिया साहित्यातील उत्कृष्ट योगदानाची दखल घेणारा 'सरला पुरस्कार' हा भारतातील ओडिशा राज्यातील एक प्रतिष्ठित वार्षिक साहित्य पुरस्कार आहे.
  • हा पुरस्कार १९८० मध्ये सुरू झाला होता.
  • ओडिया लेखकांच्या महत्त्वपूर्ण साहित्यिक कलाकृतींना हा पुरस्कार प्रोत्साहन देतानाच त्यांचा गौरव करतो.
  • 'इंडियन मेटल्स अँड फेरो अलॉयज लिमिटेड' (Indian Metals & Ferro Alloys Ltd. - IMFA) चा सामाजिक विभाग असणाऱ्या 'इंडियन मेटल्स पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट' (Indian Metals Public Charitable Trust  - IMPaCT) द्वारे हा पुरस्कार प्रदान केला जातो.
  • ७ लाख रुपये रोख रक्कम, मानपत्र आणि ताम्रपट असे या 'सरला पुरस्काराचे' स्वरूप आहे.
  • २.५ लाख रुपये रोख रक्कम, मानपत्र आणि ताम्रपट असे 'इला-बन्सीधर पांडा कला सन्मान पुरस्काराचे' स्वरूप आहे.