नुकतीच मॉन्टेनेग्रोमधील बुडवा येथे १७ ते २३ ऑक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित ४१ व्या युरोपियन चेस क्लब कप (European Chess Club Cup) आणि ३० व्या युरोपियन महिला चेस क्लब कप (European Women’s Chess Club Cup) स्पर्धेमध्ये भारतीय ग्रँडमास्टर्स निहाल सरीन आणि कोनेरू हंपी यांनी वैयक्तिक सुवर्णपदके पटकावली आहेत.

ठळक मुद्दे:

  • युरोपियन चेस क्लब कप २०२६ च्या 'ओपन' विभागात तुर्कीच्या 'बायेगन पेंडिक चेस स्पोर्ट्स क्लब'ने तर महिला विभागात मोनॅकोच्या 'सर्कल डी'एशेक्स डी माँटे-कार्लो' संघाने सुवर्णपदक जिंकले आहे.
  • सदर स्पर्धेचे आयोजन 'युरोपियन चेस युनियनद्वारे (European Chess Union - ECU)' करण्यात आले होते.
  • सदर स्पर्धेत विक्रमी १३० संघांनी ('ओपन' विभाग १०८ संघ आणि महिला विभाग २२ संघ) सहभाग घेतला होता.
  • २०२५ मध्ये ग्रीसमधील रोड्स येथे नोंदवलेला १२२ संघांचा मागील विक्रम या स्पर्धेने मागे टाकला गेला आहे.