म्हैसूरमध्ये नुकतीच 'आदिवासी भाषा आणि संग्रहालये यांवरील राष्ट्रीय परिषदेची (National Conclave on Tribal Languages and Museums)' सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्दे:

  • 'आदि वाणी (Adi Vaani)' व्यासपीठ, ५ नवीन भाषा, एक iOS ॲप आणि 'जागो (Jago)' या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित AI बॉटच्या शुभारंभानिमित्त मैसूरमध्ये ही परिषद सुरू झाली आहे.
  • कर्नाटकातील मैसूर येथे या ३ दिवसीय परिषदेचे २४ ऑगस्ट २०२६ रोजी उद्घाटन करण्यात आले आहे.
  • धोरणकर्ते, भाषातज्ज्ञ, अभ्यासक, तंत्रज्ञ आणि आदिवासी समुदायातील सदस्यांना भारतीय आदिवासी भाषा आणि संस्कृतीच्या जतनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एकत्र आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
  • आदिवासी व्यवहार मंत्रालय, कर्नाटक राज्य आदिवासी संशोधन संस्था आणि भारतीय भाषा केंद्रीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. 
  • माहिती अधिक सुलभतेने उपलब्ध करून देणे आणि त्याच वेळी आदिवासी भाषांचे जतन व दस्तऐवजीकरण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे या मुख्य उद्देशांतर्गत हे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.