नुकतेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध शिल्पकार आणि कुशल कारागीर चंद्रशेखर शिल्पी यांचे निधन झाले आहे.
ठळक मुद्दे:
- कर्नाटकच्या कलबुर्गी येथे प्रसिद्ध शिल्पकार असणाऱ्या चंद्रशेखर वाय. शिल्पी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले आहे.
- कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्यातील कक्केरा गावात त्यांचा जन्म झाला होता.
- कलाप्रकारांच्या माध्यमातून पारंपरिक शिल्प वारसा जतन करण्यासाठी [विशेषतः कल्याण कर्नाटक प्रदेशातील भारतीय मंदिर स्थापत्यशैलीवर आधारित लाकूड, दगड आणि पंचलोह (पाच धातूंचे मिश्रण) यांमधील] ते सुप्रसिद्ध होते.
चंद्रशेखर वाय. शिल्पी यांच्याबद्दल थोडक्यात महत्वाचे:
- शिल्पी यांनी लाकडी शिल्पकलेचे १८ वर्षे गुरुकुल पद्धतीचे प्रशिक्षण घेतले होते.
- दगड व पंचलोह शिल्पकलेचे तंत्र त्यानंतर त्यांनी स्वतःहून आत्मसात केले होते.
- मंदिरांचे दरवाजे, खांब, मंडप, लाकडी सभागृहे, नक्षीदार चौकटी आणि देवदेवतांच्या मूर्तीं इ. चा त्यांच्या निर्मितीकार्यात समावेश होता.
- त्यांनी शिल्पशास्त्र आणि वास्तुशास्त्राच्या तत्त्वांचे तंतोतंत पालन करत आपल्या कलाकृती भारतात कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र तसेच परदेशातही विस्तारल्या होत्या.
- १९९८ ते २००१ या कालावधीत त्यांनी कर्नाटक शिल्पकला अकादमीचे सदस्य म्हणून काम पाहिले होते.
- त्यांना २०२४ सालचा 'राष्ट्रीय कुशल कारागीर पुरस्कार' (National Award for Master Crafts-persons), २०१४ सालचा 'कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार' आणि २०१२ सालचा 'कर्नाटक शिल्पकला अकादमीचा मानद पुरस्कार' प्रदान करण्यात आला होता.