नुकतेच राष्ट्रीय सुरक्षा रक्षकमार्फत (National Security Guard - NSG) हरियाणामध्ये पहिल्या 'महिला कमांडो कन्व्हर्जन कोर्सचे (Mahila Commando Conversion Course - MCCC)' अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  •  हरियाणामधील मानेसर येथे दहशतवादविरोधी विशेष मोहिमांसाठी महिला जवानांना प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने NSG ने आपला पहिला 'महिला कमांडो कन्व्हर्जन कोर्स' सुरू केला आहे.
  • दहशतवादविरोधी विशेष मोहिमांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
  • राज्य पोलीस दले आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमधून निवडक महिला जवानांसाठी हा १२ आठवड्यांचा अभ्यासक्रम आहे.
  • सर्वसमावेशक शारीरिक, तांत्रिक तसेच रणनीतिक प्रशिक्षणाद्वारे देशाच्या सुरक्षा दलांमध्ये दहशतवादविरोधी मोहिमांसाठी अधिक सक्षम महिला तयार करणे हे या अभ्यासक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
  • उमेदवारांची लढाऊ क्षमता आणि निर्णय घेण्याची कौशल्ये वाढवण्यासाठी हा कठोर प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

मुख्य प्रशिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट बाबी:

  • शारीरिक तंदुरुस्ती आणि क्षमता विकसन
  • शस्त्रास्त्रे हाताळणी कौशल्य विकास
  • अचूक नेमबाजी कौशल्य
  • रणनीतिक हस्तक्षेप कौशल्य विकास
  • दहशतवादविरोधी विशेष मोहिमा

NSG बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): NSG म्हणजेच 'National Security Guard' अर्थात 'राष्ट्रीय सुरक्षा रक्षक' होय.
  • स्थापना वर्ष: १६ ऑक्टोबर १९८४ रोजी NSG ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे NSG चे मुख्यालय स्थित आहे.
  • सध्या कार्यरत महासंचालक: सध्या बी. श्रीनिवासन (आयपीएस) हे NSG च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
  • संस्थेचे बोधवाक्य: 'सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा' हे NSG चे बोधवाक्य आहे.