नीती आयोगामार्फत (NITI Aayog) नुकतेच नवी दिल्ली येथे आयोजित ५ व्या e-FAST परिषदेत PACT आणि ZET मार्केटप्लेसचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- नवी दिल्ली येथे आयोजित ५ व्या 'शाश्वत वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक-फ्रेट ॲक्सिलरेटर' (Electric-Freight Accelerator for Sustainable Transport - e-FAST) इंडिया परिषदेत नीती आयोगाने (NITI Aayog) नुकतेच 'प्लॅटफॉर्म फॉर ॲग्रिगेटिंग क्लीन ट्रान्सपोर्ट (Platform for Aggregating Clean Transport - PACT) सुरू केले आणि त्यासोबतच 'शून्य-उत्सर्जन ट्रक' (Zero-Emission Truck - ZET) मार्केटप्लेसचे अनावरण केले आहे.
मार्केटप्लेसबाबत महत्त्वाचे मुद्दे:
PACT मार्केटप्लेस:
- माल पाठवणारे, लॉजिस्टिक्स सेवा पुरवठादार तसेच या क्षेत्रातील इतर संबंधित घटकांकडून मालाच्या वाहतुकीची मागणी एकत्रित करणे आणि या मागणीचे रूपांतर निश्चित केलेल्या मालवाहतूक मार्गांवर (freight corridors) वाहने तैनात करण्याच्या संधींमध्ये करणे हा PACT चा मुख्य उद्देश आहे.
ZET मार्केटप्लेस:
- हे एक परस्परसंवादी व्यावसायिक व्यासपीठ आहे.
- ई-ट्रक उत्पादक, लॉजिस्टिक्स सेवा पुरवठादार, चार्ज पॉइंट ऑपरेटर्स, वित्तपुरवठादार तसेच तंत्रज्ञान कंपन्या यांना एकमेकांशी जोडण्याचे काम ZET करते.