राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (National Institute of Technology - NIT) श्रीनगर ,जम्मू आणि काश्मीर ही भारतातील आपल्या कॅम्पसमध्ये एक समर्पित खगोलशास्त्रीय वेधशाळा (Astronomical Observatory) उभारणारी पहिली NIT ठरली आहे.

ठळक मुद्दे:

  • १४-इंच क्षमतेची 'सेलेस्ट्रॉन C14 EdgeHD ॲप्लानॅटिक श्मिट-कॅसेग्रेन' दुर्बीण सदर वेधशाळेत बसवण्यात आली आहे.
  • NIT श्रीनगरचे संचालक प्रा. अनुराग मिश्रा आणि काश्मीर विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. नासिर इक्बाल यांच्या हस्ते NIT श्रीनगर खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी वेधशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
  • सदर सुविधा ही 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स' (IIA), बेंगळुरू, कर्नाटक यांच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने विकसित करण्यात आली आहे.

NIT श्रीनगरबाबत महत्वपूर्ण माहिती: 

  • स्थापना वर्ष: NIT श्रीनगरची स्थापना १९६० मध्ये झालेली आहे.
  • वैशिष्ट्य: ही एक प्रमुख सार्वजनिक स्वरूपाची तांत्रिक संस्था/विद्यापीठ आहे.
  • स्थानबद्ध: सदर संस्था ही जम्मू आणि काश्मीरमधील हजरतबल येथील दल सरोवराच्या पश्चिम काठावर विराजमान झाली आहे.