'राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेमार्फत (National Council for Teacher Education - NCTE)' नुकतीच 'अध्यापन, संशोधन आणि मूल्यमापनविषयक मार्गदर्शन उपक्रम (Mentoring Initiative for Teaching, Research, and Assessment - MITRA)' उपक्रमांतर्गत भारताच्या पहिल्या महिला भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी डॉ. किरण बेदी यांची 'राष्ट्रीय मार्गदर्शक (National Mentor)' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- शिक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या NCTE मार्फत भारताच्या पहिल्या महिला भारतीय पोलीस सेवा (Indian Police Service - IPS) अधिकारी आणि पुद्दुचेरीच्या माजी नायब राज्यपाल डॉ. किरण बेदी यांची त्यांच्या 'MITRA - मित्रा' या उपक्रमांतर्गत 'राष्ट्रीय मार्गदर्शक' म्हणून नियुक्ती केली आहे.
- १८ नोव्हेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथील NCTE मुख्यालयातून आयोजित एका ऑनलाइन सत्राद्वारे त्यांची ही अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. किरण बेदी यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:
- १९७२ मध्ये भारतीय पोलीस सेवेत (IPS) रुजू होतानाच त्या भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी ठरल्या होत्या.
- अगदी नजीकच्या काळात त्यांनी पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल (मे २०१६ ते फेब्रुवारी २०२१) म्हणून काम केले आहे.
प्राप्त सन्मान/ पुरस्कार:
- रॅमन मॅगसेसे पुरस्कार (Ramon Magsaysay Award) - १९९४