NABL द्वारे 'मोबाइल अन्न चाचणी प्रयोगशाळांसाठी (Mobile Food Testing Laboratories)' भारतातील पहिली मान्यता योजना (Accreditation Scheme) सुरू
ठळक मुद्दे
- 'चाचणी आणि मापन प्रयोगशाळांसाठीच्या राष्ट्रीय मान्यता मंडळाने' (National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories - NABL), 'एकात्मिक मूल्यांकन कार्यक्रमांतर्गत (Integrated Assessment Programme)' मोबाइल अन्न चाचणी प्रयोगशाळांसाठी भारतातील पहिली मान्यता योजना सुरू केली आहे.
- NABL हे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या (MoCI) अंतर्गत असलेल्या 'उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागा'च्या (DPIIT) अखत्यारीतील 'भारतीय गुणवत्ता परिषदेची ' (Quality Council of India - QCI) ची घटक संस्था आहे.
- नवी दिल्ली येथे आयोजित 'गुणवत्ता समन्वय – बहुपक्षीय सामंजस्य करार आदान-प्रदान सोहळा' या कार्यक्रमादरम्यान ही योजना सुरू करण्यात आली.
NABL बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- स्थापना वर्ष: १९९८ मध्ये NABL ची स्थापना करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे NABL चे मुख्यालय स्थित आहे.
- सध्याचे कार्यरत अध्यक्ष: डॉ. संदीप शाह NABL चे सध्याचे कार्यरत अध्यक्ष आहेत.