नुकताच नाबार्डची उपकंपनी असणाऱ्या 'नाबकिसान(NABKISAN)' मार्फत NSE वर भारतातील पहिला 'पाणी, स्वच्छता आणि आरोग्य-स्वच्छताक्षेत्रावर केंद्रित (Water, Sanitation and Hygiene - WASH)' 'सोशल बाँड (Social Bond)' सूचीबद्ध करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे:
- 'राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (National Bank for Agriculture and Rural Development - NABARD)' उपकंपनी असलेल्या 'नाबकिसान फायनान्स लिमिटेड'तर्फे पाणी, स्वच्छता आणि आरोग्य-स्वच्छता क्षेत्रासाठी समर्पित असलेला भारतातील पहिला 'सोशल बाँड' नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE), मुंबई (महाराष्ट्र) येथे सूचीबद्ध करण्यात आला आहे.
- या बाँड्सद्वारे उभारलेला निधी ग्रामीण आणि सुविधांपासून वंचित असलेल्या समुदायांमध्ये सुरक्षित पाणी, स्वच्छता आणि आरोग्य-स्वच्छता (WASH) सुविधांचा विस्तार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
NABARD बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): NABARD म्हणजेच National Bank for Agriculture and Rural Development अर्थात 'राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक' होय.
- स्थापना वर्ष: बी. शिवरामन समितीच्या शिफारसीनुसार, नाबार्ड कायदा, १९८१ अंतर्गत १२ जुलै १९८२ रोजी NABARD ची स्थापना करण्यात आली होती.
- वैशिष्ट्य: कृषी आणि ग्रामीण विकासासाठी अर्थपुरवठा करणे या मुख्य उद्देशाने प्रेरित अशी भारतातील सर्वोच्च विकास-वित्तीय संस्था आहे.
- मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे NABARD चे मुख्यालय स्थित आहे.
- सध्या कार्यरत अध्यक्ष: सध्या डॉ. शाजी कृष्णन व्ही. (शाजी के.व्ही.) हे NABARD च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
नाबार्ड स्थापित ७ उपकंपन्या:
- नाबसमृद्धी (NABSAMRUDDHI)
- नाबफिन्स (NABFINS)
- नाबफाउंडेशन (NABFOUNDATION)
- नाबकिसान (NABKISAN)
- नाबव्हेंचर्स (NABVENTURES)
- नाबसंरक्षण (NABSanrakshan)
- नाबकॉन्स (NABCONS)